मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ४० खोक्यांखाली चिरडून काम करत आहेत. चाळीस खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत त्यामुळे मला आलेल्या धमकीबद्दल आणि सामना कार्यालयात झालेल्या पोलिसांच्या दमदाटीबद्दल मी त्यांना भेटणार नाही. त्यांची अवस्था दयनीय आहे असं वक्तव्य केले आहे.
नाशिकला असताना मी पोलिसांशी बोललो होतो की, मी नाशिकमध्ये आहे तुम्ही आत्ता येऊ नका. तरीही पोलीसांनी येऊन दमदाटी केली. प्रिंट केलेले कागद आधीच त्यांच्याकडे होते. त्यावर जबरदस्तीने सह्या घेण्यात आल्या. मी हा सगळा प्रकार पोलीस आयुक्तांना कळवणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मला आलेल्या धमकीविषयी मी फडणवीसांना कळवले होते. पोलिसांनी सामनाच्या कार्यालयात मी नसताना घुसून जी दमदाटी केली त्याबद्दल मी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिणार आहे.
दरम्यान, माझ्यावर सध्या गुन्हे दाखल केले जात आहेत काही हरकत नाही मी घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.