मुंबई | काल शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता हे अध्यक्षपद कोण भूषवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार कुटुंबियांकडून घोषीत केला जाणार नाही, तर यावर नेमलेली समिती निर्णय घेणार आहे.
शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही सुरु आहे. या बैठकीनंतर याची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत काही नावं प्रामुख्यानं घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण त्यांचा देशपातळीवरील इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क तसेच संवादही चांगला आहे. आता हे अध्यक्षपद कोण भूषवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.