मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची प्रदेश कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये 16 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 16 सचिव यांच्यासह इतर महत्वाची पदही जाहीर झाली आहेत.
बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती देताना ते म्हणाले प्रदेश कार्यकारिणीत १०५ पदाधिकारी आणि सदस्य असतील. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी हे उपाध्यक्ष असतील. तसेच इतर उपाध्यक्षांमध्ये सुरेश हळवणकर, संजय बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, स्मिता वाघ, जयप्रकाश ठाकूर, राजेंद्र गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सरचिटणीसपदी माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, रणधीर सावरकर, विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.