मुंबई | बाळासाहेब ठाकरेंनी धार्मिक आवाहन केले म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क काढण्यात आला होता पण कदाचित आता नियम बदलले असतील. मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे पतंप्रधान मोदींनी जाहीर सभेत सांगितले. देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर कर्नाटकातील मराठी जनतेने देखील मतदान करताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणा आणि मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केले आहे. मराठी बांधवांच्या हित जपणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना मत द्या, असेदेखील ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. शरद पवारांच्या निर्णयावार बोलताना त्यांनी प्रत्येक पक्षाला पक्षंतर्गत बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. माझ्याकडून तरी महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काहीही राष्ट्रवादीत होणार नाही असं म्हटलं.
तसेच त्यांच्या आत्मचरित्रात शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात दोनदा जाण्यावर टीका केली आहे. यावर पहिल्यांदाच बोलताना शरद पवारांना सल्ला देणारा मी कोण? दिलेला सल्ला त्यांना पचनी पडेल का? असं म्हटलं आहे.
देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करण्यास माझा पाठिंबा नाही, वृत्तीचा पराभव करायची इच्छा असते. त्यासाठीच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, असे ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान मी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात काय केलं हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही.