मुंबई | सध्याच्या राजकारण पाहता सर्व राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आता छेद निर्माण झाला आहे अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठका आयोजित केल्या आहेत.
या बैठकीत कोणता नेता कोणत्या बैठकीला हजेरी लावणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे कोणाला किती आमदारांचा पाठिंबा आहे याचा निर्णय होईल.
या दरम्यान अजित पवारांच्या गटातून काही नेते शरद पवार यांच्याकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते, आमदारांची बैठक मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये तर एमईटी इन्स्टिट्यूट याठिकाणी अजित पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत कोण काय बोलणार याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.