पुणे । सध्या पारंपरिक लूकला इंडो वेस्टर्न टच कसा देता येईल याकडे अनेकांचा कल वाढला आहे. काही दिवसांपूर्वी डायमंड आणि इतर दागिने घातले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा पारंपारिक दागिन्यांनी आपली जागा घेतली आहे. सध्याचा ट्रेंड आहे तो खणाच्या दागिन्यांचा.. फॅशनच्या दुनियेत खणापासून वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. असाच आगळा वेगळा प्रयोग भीमथडी जत्रेत पाहायला मिळाला. श्रेया मराठे या महिलेने घर सांभाळून आपल्यातील कला जपली. त्यांना खणाची प्रचंड आवड असल्याने श्रेया यांनी खणापासून तयार केलेली ज्वेलरी आणि साहित्य लक्षवेधक ठरले.