20 जानेवारी पासून आंतरवाली सराटीतून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण मोर्चा 25 जानेवारीला नवी मुंबईत येऊन धडकला…. मुळात हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन थांबणार होता… मात्र, सरकारच्या विनवणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मोर्चा नवी मुंबईतील वाशीमध्ये थांबवला आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला आणखी एक दिवस वाढवून दिला… या एका दिवसात सरकारच्या शिष्टमंडळाच्या जरांगे पाटील यांच्याशी भेटी झाल्या…. आणि 27 जानेवारीच्या पहाटे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर हे सरकारचा निर्णय घेऊन जरांगे पाटील यांच्या भेटीला आले… केसरकर यांनी आणलेल्या जीआरमध्ये जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भात केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. सरकारनं मराठा समाजाला मोठा दिलासा दिला… त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आणि उपोषण मागे घेत आंदोलनाला स्थगिती दिली.तर, दुसरीकडे गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलं आहे.. 23 ते 31 जानेवारी असे तब्बल आठ दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे. हे सर्वेक्षण नेमकं कसं केलं जाईल…लोकांना काय प्रश्न विचारले जातील हे जाणून घेऊयात…