पुणे | पुण्यातील गंगाधाम येथील राजयोग लॉनमध्ये येत्या ५ फेब्रुवारीला लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या सखी मंच अंतर्गत लायन्स लेडीज प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळात नाशिक, मालेगाव, लोणावळा, पिंपरी चिंचवड आणि पुणे या जिल्ह्यांतील एकूण १२ संघ तसेच १७० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दि. २६ जानेवारी रोजी पीवायसी जिमखाना येथे या स्पर्धेचा भव्य लिलाव आणि चषक प्रकटीकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी, सीईओ लायन श्याम खंडेलवाल, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, जितो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अरुण शेठ, डिस्ट्रिक्ट आणि सखी मंचचे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर सखी मंचच्या अध्यक्षा भारती भंडारी, सुवर्णा दोशी, सुजाता शहा, प्रियांका परमार, शीतल गदिया, कविता अग्रवाल आणि संपूर्ण सखी मंच टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- सहभागी संघांची नावे
शेठ मरमेड्स, कुशल लँडमार्क शार्क्स, सूरज इन्फो क्वीन्स, एच पी व्हेल्स, कोको मेल्ट्स मेव्हेरिक्स, अर्कारी चॅलेंजर्स, चेकर डायनॅमोस, रहाटणी रॉकर्स, मुथा स्ट्रायकर्स, श्रुती आर्ट्स स्कॉर्पियन्स, गोयल डॉल्फिन्स, एम बी शुगर टायटन्स