सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. अशातच प्रत्येक पक्षांच्या संभाव्य उमेदवार आणि लोकसभा जागांसाठीची चाचपणी सुरू झालीये. सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी प्रत्येक पक्षा आपली ताकद असलेल्या मतदारसंघांची स्वतंत्र चाचपणी करताना दिसत आहेत. अशातच आता महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झालीये. यातीलच 11 मतदारसंघांची आणि त्यातील उमेदवारांची यादी सध्या विश्वसनीय सूत्रांकडून समोर आलीये.
ठाकरे गटाकडून या 11 उमेदवारांच्या मतदारसंघाची चाचपणी देखील पूर्ण झाल्याची सध्या माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे या 1 उमेदवारांच्या नावावर स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केल्याची माहितीसुद्ध सूत्रांकडून समजतेय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा लढवण्यासाठी निश्चित झालेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार
1) शिर्डी लोकसभा मतदारसंघ – भाऊसाहेब वाकचौरे
2) बुलढाणा लोकसभा मतदारसंघ – नरेंद्र खेडेकर
3) ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ – संजय दिना पाटील
4) रायगड लोकसभा मतदारसंघ – अनंत गीते
5) रत्नागिरी,सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ – विनायक राऊत
6) दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ – अरविंद सावंत
7) वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ – अमोल कीर्तीकर
8) संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ -चंद्रकांत खैरे
9) धाराशिव लोकसभा मतदारसंघ – ओमराजे निंबाळकर
10) परभणी लोकसभा मतदारसंघ – संजय जाधव
11) ठाणे लोकसभा मतदारसंघ – राजन विचारे
दरम्यान, यासंदर्भात आत्तापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली. तरीही वर दिलेल्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं वारंवार समोर आलंय. त्यामुळेच आता या जागांसाठीच्या उमेदवारांची चर्चा जोरात सुरू झालीये.