निवडणूक रोख्यांमधून कमावले अन् विरोधकांचे गोठवले
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मोठ्या पेचात अडकली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी प्राप्तिकर विभागाकडून पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती खर्गेंनी दिली. याबरोबरच ७० वर्षाच्या इतिहासात असं कधीही झालं नाही आता १८ व्या लोकसभा निडणुकीत विरोधकांवर दबाव निर्माण करुन भाजप एकतर्फी निवडणुका करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही त्यांनी म्हटल आहे. नेमकं हे प्रकरण काय? हेच खालील व्हिडीओतून जाणून घ्या.
प्राप्तिकर विभागाकडून 210 कोटी रुपयांच्या कर मागणीवरून कॉंग्रेसची खाती गोठवण्यात आली आहे. सध्याच्या सत्ताधारी पक्षाने आपल्या खात्यात हजारो कोटींहून अधिक रक्कम जमा केली तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्षाचे बँक खाते षडयंत्र रचून गोठवण्यात आलं आहे जेणेकरून आम्ही निवडणूक लढवू शकणार नाही असा खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी कोणत्याही कुटुंबाचे खाते गोठवले तर ते उपाशी मरते. सात वर्षांपूर्वी 14 लाखाचे प्रकरण होते. आज 200 कोटी वसुल करता आहेत. नियमानूसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड होतो. सीताराम केसरी यांच्या काळातील नोटीसी आता दिल्या जात आहेत. देशात लोकशाही आहे हे सर्वात मोठे असत्य आहे. आमची खाती फ्रिज केली जात नसून लोकशाहीच फ्रिज केली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
तसेच आर्थिक वर्षे 2017-18 साठी एक नोटीसीसाठी चार बॅंकातील आमच्या 11 बॅंक खात्यातील 210 कोटी रुपयांच्या निधीवर अंकुश बसवण्यात आला आहे. 199 कोटी रुपयांच्या एकूण निधीतील केवळ 14.49 लाख रोकड सापडली होती. ही रोख रक्कम एकूण दानापैकी केवळ 0.07 टक्के आहे आणि शिक्षा 106 टक्के रकमेला झाल्याचे काँग्रेस नेते अजय माकन यांनी म्हटलं आहे.
येणारी निवडणुक जर निष्पक्षपणे घ्यायची असतील तर त्यांनी आमच्या पक्षाला कोणत्याही निर्बंधाशिवाय बँक खाती वापरण्याची परवानगी द्यावी असं आवाहन खर्गे यांनी केलं आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभाग यावर काय भूमिका घेणार हे पाहण महत्वाचं असेल…