पुणे | लायन्स सखी मंच आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2च्या वतीनं सखीज गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सखी मंचमधील निवडक 20 स्पर्धकांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, गायन, विविध वाद्यांचे वादन आणि अभिनय अशा पाच विविध कलांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी म्हणून माणिकचंद ग्रुपच्या संचालक दीना धारीवाल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्यासह सर्व माजी प्रांतपाल त्यांच्या पत्नी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गणरायाला वंदन करून करण्यात आली.
सखी मंचमधील महिलांना त्यांच्यातील सुप्त कलागुण सादर करण्याची संधी मिळावी यासाठी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची भावना सखी मंचच्या अध्यक्षा लायन भारती भंडारी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमापूर्वी सखी मंचमधील अनेक महिलांनी कार्यक्रमासाठी ऑडिशन्स दिले. त्यातील निवडक 20 महिलांना सखीस गॉट टॅलेंट या कार्यक्रमात आपल्या कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण उपक्रमात प्रसिद्ध सिने कलाकार ज्योती गोराणे, वायटीए अकादमीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष धेंग आणि ऑयस्टर डान्स अकादमीच्या संस्थापक दीपा बाफना यांनी परिक्षक म्हणून काम केले. या तिनही परिक्षकांनी सखीस गॉट टॅलेंट शोमध्ये सहभागी स्पर्धकांचे कौतुक करत लायन भारती भंडारी आणि लायन विजय भंडारी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांचे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांनी तोंड भरून कौतुक केले. यासह लायन्स सखी मंच आणि सखीज गॉट टॅलेंट कार्यक्रमाच्या आयोजकांचेही अभिनंदन केले. कार्यक्रमावेळी लायन नरेंद्र भंडारी, रांका ज्वेलर्सचे लायन फत्तेचंद रांका, मालपाणी समूहाचे लायन गिरीश मालपाणी, जालान ग्रुपचे लायन द्वारका जालान, माजी प्रांतपाल, डिस्ट्रिक्टचे सीईओ लायन श्याम खंडेलवाल, सचिव लायन अशोक मिस्त्री, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 मधील रिजन चेअरपर्सन, झोन चेअरपर्सन, लायन्स सखी मंचच्या महिला व क्लबचे लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सखी मंचने आयोजित केलेल्या सखीस गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या करण्यात आले होते. यावेळी 20 महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. महिलांमध्ये लपलेले गुण सादर करण्याची संधी त्यांना मिळाली तर किती सुंदर कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो हे सखी मंचने दाखवून दिले आहे. सखी मंचतर्फे आयोजित अनेक कार्यक्रमांमधील हा एक उत्कृष्ट, नियोजनबद्ध आणि मनोरंजक असा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला. त्याबद्दल सखी मंचच्या सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
- लायन विजय भंडारी (प्रांतपाल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2)