मुंबई : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले. एवढंच नव्हे तर त्यांचा तुरुंगातून सुटल्यानंतर जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्त्री वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर गुजरातमध्ये मोदींच्याच विचाराच्या सरकारने लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुजरातमधील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला तर फक्त बोलणं महत्त्वाचं नसून कृती महत्त्वाची असते, अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
बिल्किस बानोच्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेवरुन देशभरात निदर्शने होत आहेत. बिल्किस बानोला न्याय मिळावा यासाठी अनेक समाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही देखील बिल्किस बानोला न्याय मिळावा म्हणून राज्यभर मूकनिदर्शने केली. आज शरद पवार यांनी ठाणे शहरात पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारने घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी जोरदार टीका केली.
जन्मठेप ही आजन्म असते. पण बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांचा तुरुंगातून सुटल्यानंतर जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्त्री वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर गुजरातमध्ये मोदींच्याच विचाराच्या सरकारने लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे. अशा अनेक विरोधाभासी गोष्टी या सरकारमध्ये पाहायला मिळतात, असे शरद पवार यांनी म्हटले.