लंडनमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ ( आयओडी ) या संस्थेच्या सदस्यपदी पुण्यातल्या ‘सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( आयओडी ) ही ब्रिटनसह जगभरातले कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना आहे. या संघटनेशी जगभरातील ३० हजारांहून अधिक मंडळ सदस्य जोडलेले असून भारत, दुबई, सिंगापूर आणि लंडन अशा ठिकाणी वार्षिक परिषदांमधून सदस्य मंडळासंबंधित विविध विषय आणि प्रश्नांवर चर्चा होते.
गेल्या तीस वर्षांपासून नेतृत्व, कौशल्य व क्षमताविकास यासाठी ही संघटना सदस्य मंडळ समुदायाला सेवा देते. ‘ग्लोबल बिझनेस मीट’ आयोजित करून जगभरातले उद्योजक, धोरणकर्ते आणि सदस्य मंडळाला एकत्रित आणले जाते. या मंडळ सदस्यांमध्ये वैविध्यता असून त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, बँकर, सल्लागार, शिक्षणतज्ज्ञ आदींचा समावेश आहे; त्यामुळे नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धी व विस्ताराची संधी एकाच छताखाली उपलब्ध होते. दरवर्षी भारतातल्या किंवा परदेशातल्या मान्यवर व्यक्तींना ‘आयओडी डिस्टिंग्विश्ड फेलो’ म्हणून सन्मानित करण्यात येतं. ‘सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा व्यापक आणि वैविध्यपूर्ण अनुभव लक्षात घेऊन त्यांना संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. डॉ. संजय बी. चोरडिया हे ‘आयओडी इंडिया’चे फेलो सदस्य आहेत. या नियुक्तीमुळे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय संचालक, व्यावसायिक, धोरण निर्माते इत्यादींसह चांगल्या नेटवर्किंगची संधी देतं. या सदस्यत्वामुळे व्यावसाय सल्ला प्रकल्प, इंटर्नशिप्स आणि इतर उपक्रमांतून ‘सूर्यदत्त’ च्या विद्यार्थ्याना भारतातल्या आणि परदेशातल्या कंपन्यांशी जोडण्यास मदत होणार आहे. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नियुक्तीबद्दल ‘सूर्यदत्त परिवारा’तर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. ही नियुक्ती सूर्यदत्त संस्थेला आणखी चांगलं काम विस्तारानं करण्याची संधी देईल; तसेच आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जोडण्यासाठी याचा उपयोग होईल. सर्वांसाठी, ‘सर्वांगीण व गुणवत्तापूर्वक जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचं काम यापुढेही आणखी जोमानं करणार आहे.’ अशी भावना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली.