आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेक नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झालीय. विधानसभेसाला तिकीट मिळावं आणि आपल्या मतदारसंघातलं आपलं राजकीय वर्चस्व टिकावं यासाठी अनेकांनी आतापासूनच पक्षांतर करायला सुरवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले खरे पण लोकसभेचा निकाल पाहून आता विधानसभेसाठी पुन्हा काही नेत्यांनी शरद पवारांचा रस्ता धरल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. माढ्यात देखील याचा प्रत्यय आलाय.. अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांचे धाकटे भाऊ रमेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तुळात त्या भेटीची चर्चा रंगलीय… लोकसभेला बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळाला आता त्याची पुनरावृत्ती माढ्यात पाहायला मिळणार का..? माढ्यात शिंदे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार का..? हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत..
लोकसभेला भाजपाने माढा मतदारसंघातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या धर्यशील मोहिते पाटील यांनी घरवापसी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी भाजपाच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा १,२०,८३७ मतांनी पराभव केला आणि शरद पवार यांनी माढ्यात टाकलेला डाव यशस्वी झाला. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेला देखील शरद पवार यांनी विशेष रणनीती आखल्याचं बोललं जातंय. अजित पवारांसोबत असलेले आमदार बबन शिंदे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमदेवार शिवाजी सावंत यांचा ६३,१६९ मतांनी त्यांनी पराभव केला होता आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा ३५,७७८ मतांनी पराभव केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत बबन शिंदे यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा ६८,२४५ मतांनी पराभव केला… आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय.. तसंच बबन शिंदे यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे यांनी देखील आपल्या मुलाला धनराज शिंदे यांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बबन शिंदे हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे त्या मतदारसंघात शरद पवारांना विधानसभेसाठी उमेदवार हवा आहे… ही गोष्ट लक्षात येताच रमेश शिंदे यांनी संधी साधत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळं आता माढा विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्व शिंदे असा सामना होणार असं वाटतं. परंतु, याविषयीची स्पष्टता थोड्याच दिवसात येईल. याखेरीज माढा विधानसभेत शिंदे बंधूंच्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यता आहे…आणि ती व्यक्ती म्हणजे संजय पाटील घाटणेकर.