विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्ष दौरे करत आहेत. परंतु सध्या चर्चा होती आहे ती अजित पवार यांची आणि त्यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटची. सध्या अजित पवार आणि गुलाबी रंगाचं एक वेगळंच समीकरण बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान आणि नंतर देखील अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून येतात. जनसन्मान यात्रेदरम्यान आज १२ ऑगस्टला ते धुळे दौऱ्यावर ते होते. धुळे येथे झालेल्या मेळाव्यात चक्क मुस्लिम महिला देखील गुलाबी रंगाच्या हिजाब मध्ये दिसून आल्या.
अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने धुळे दौऱ्यावर आहेत. धुळ्यातील मारिया हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला मुस्लिम महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमादरम्यान ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या ठिकाणी गुलाबी रंगाचे बॅनर तसंच पोडियम आणि अजित पवार यांचे गुलाबी रंगाचे जॅकेट हेच ठळकपणे दिसत होत परंतु संपूर्ण कार्यक्रमात लक्षवेधी ठरल्या त्या मुस्लिम महिला. मुस्लिम महिला या गुलाबी रंगाच्या हिजाब मध्ये दिसून आल्या. यामुळे आता सर्वत्र चर्चा होतीये ती मुस्लिम महिलांनी परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या हिसाबची. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यांनतर महायुतीत सामील झाले. यामुळे मुस्लिम मतदारसंघ त्यांच्यापासून दूर गेल्याचे दिसत होते परंतु धुळे येथील जनसन्मान यात्रेनिमित्त झालेल्या मेळाव्यात मुस्लिम महिलांनी गुलाबी रंगाचे हिजाब परिधान केल्यामुळे पुन्हा एकदा दुरावलेला मुस्लिम मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे वळत असल्याचं पाहायला मिळालं.