मुंबई: आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीला शेअर बाजारमध्ये घसरण झाल्यानंतर बाजार बंद होताना मात्र तो काहीसा सावरल्याचं चित्र आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 37 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 12 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,298 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.07 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,956 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बँकमध्ये आज 194 अंकांची वाढ होऊन तो 39,656 वर पोहोचला.
आज कोटक महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 3.52 टक्क्यांची वाढ झाली. त्या खालोखाल लार्सेन कंपनीच्या शेअर्समध्ये 2.09 टक्क्यांची वाढ झाली. तर ओएनजीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 2.94 टक्के तर डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअर्समध्ये 2.10 टक्क्यांची घट झाली.

शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
शेअर बाजारात सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्समध्ये (Sensex) 150 अंकांची घसरण दिसून आली होती. तर, निफ्टीमध्ये (Nifty) घसरण दिसून आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 56 अंकांच्या घसरणीसह 17,888.20 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 206 अंकांच्या घसरणीसह 60,053.71 अंकांवर व्यवहार करत होता.