पुणे । बालगंधर्व रंगमंदिर येथे समाज विकास विभागातर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांतर्गत महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिकांनी सहभाग घेतला होता.यावेळी प्री प्रायमरी विभाग प्रमुख नेहा अभ्यंकर व समन्वयक चैताली दाभाडे, अनिता सिंह तसेच मीनल संमनवार, प्रीती पवार, कविता साळी, मृण्मयी देहेडकर, श्रुती निफाडकर यांनी ‘महिला सशक्तीकरण’ यावर ॲक्ट सादर केला. या ‘ॲक्ट’ च्या माध्यमातून त्यांनी ‘स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे व ती वेळेला नवदुर्गा ही होऊ शकते तसेच महिला नेहमी समाजात महत्त्वाची भूमिका बजावतात असा संदेश दिला. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक पायगुडे व संस्थेचे संचालक व प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्री प्रायमरी विभाग प्रमुख नेहा अभ्यंकर व समन्वयक चैताली दाभाडे यांच्या संकल्पनेतून शाळेच्या शिक्षकांनी उत्तम सादरीकरण केले.
या ‘ॲक्ट’ सादरीकरणानंतर प्री प्रायमरी विभाग प्रमुख नेहा अभ्यंकर यांनी आपले विचार व्यक्त केले. वाईट वेळ आली की स्त्री ही नवदुर्गा, महिषासुरमर्दिनी होऊ शकते. याचे ज्वलंत उदाहरण आपण आमच्या ‘महिला सशक्तीकरण’ या ॲक्टच्या माध्यमातून पाहिले. आपण नेहमीच सांगतो मुलांनी खंबीर, आत्मनिर्भर व्हावं आत्ताच्या काळात पालकांनी मुलींना तलवार बाजी, लाठी काठी, कराटे हे खेळ शिकवायलाच हवे. मुलींना एक वेळ स्वयंपाक नाही आला तरी चालेल पण स्वःसंरक्षण आलेच पाहिजे. असं मत व्यक्त करून स्कुलच्या प्री प्रायमरीच्या टीचर्स, डे केअरच्या टीचर्स यांनी शाळेत मुलांना सांभाळून हा ॲक्ट सादर केला त्याबद्दल त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. यानंतर सर्व शिक्षिकांना पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
- नेहा अभ्यंकर, प्री. प्रायमरी विभाग प्रमुख