भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीये. भाजपच्या या पहिल्या यादीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केलेल्या जागांवर भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत. शिंदे सेनेला पाच जागांवर त्याग करावा लागला आहे. ज्या पाच जागांवर भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत त्या जागा शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जातात. अशा जागांवर शिंदे सेनेला पाणी सोडावं लागलं आहे. खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही जागांवर त्याग करण्याची सूचना केल्याची राजकीय चर्चा होती. अलीकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यागाला फुटपट्टी नसते, पण एकनाथ शिंदेंनी मन मोठं करायला हवं असं म्हटलं होतं . त्यानंतर भाजपने आपली पहिली यादी प्रसिद्ध करत ९९ उमेदवारांना तिकीट जाहीर केलं. आणि यातील पाच जागा शिंदे सेनेला गमवाव्या लागल्या आहेत. या पाच जागा नेमक्या कोणत्या तिथं भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे ? हे आपण या व्हिडिओतून पाहू..