पुणे । जीतो युथ विंग आणि जीतो पुणेच्या वतीने ‘जीतो युथ प्रीमियर लीग 2024’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार असून यामध्ये ३० संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे बुधवारी रात्री या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. जीतो युथ प्रीमियर लीग 2024 च्या घोषणेप्रसंगी जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड, मुख्य सचिव दिनेश ओसवाल, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव बाठिया, मुख्य सचिव सुयोग बोरा, स्पर्धेचे समन्वयक ऋषभ दुगड व सहसमन्वयक अभिषेक मुथा, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक दुगड ग्रुपचे रवींद्र दुगड व सहप्रायोजक स्टडी स्मार्ट चे चेतन जैन उपस्थित होते. यावेळी गौरव बाठिया यांनी स्पर्धेची माहिती दिली.
या कार्यक्रमास जीतो अॅपेक्स चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजेंद्र जैन, जीतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र सांकला, जीतो अॅपेक्सचे संचालक धीरज छाजेड, सुजित भटेवरा, प्रियंका परमार, जीतो पुणे चॅप्टर व्हॉइस चेअरमन अजय मेहता, चेतन भंडारी व विशाल चोरडिया, सचिव लक्ष्मीकांत खाबिया, जीतो पुणे वुमन विंगच्या अध्यक्षा पूनम ओसवाल, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे किरण चोरमले व युवा कार्यकारणी म्हणून आकाश ओसवाल, प्रणय भंडारी, सिद्धार्थ गुंदेचा, रोहन संघवी, जय नहार, निधी चोरडिया आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीतो युथ विंग मार्फत होणारी ही स्पर्धा ८, ९ आणि १० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून, यात पुण्यातील विविध युवा खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत ३५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून या स्पर्धेमध्ये एकूण ३० संघ सहभागी होणार असून त्यामध्ये २४ पुरुष तर ६ महिलांचे संघ आहेत. प्रत्येक संघात ९ खेळाडू असणार आहेत. ही स्पर्धा पुण्यातील पुष्पा स्पोर्ट्स अकॅडमी येथे होणार आहे. जीतो युथ प्रीमियर लीगमधून युवा खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास करण्याची आणि चांगल्या स्पर्धात्मक वातावरणात आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे. जीतो युथ प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दल उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे.