महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. महाविकास आघाडीचा महायुतीनं दारुण पराभव केला आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले. विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्रित काम केलं. महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील पाच वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. फडणवीस आता मुख्यमंत्री तर, शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार त्याच भूमिकेत म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. या तिन्ही नेत्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची. याचसंबंधी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यानुसार, त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिकची वाढ दिसून आली आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी रुपये इतकी होती. यावेळी म्हणजे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये इतकी संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपयांचं कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 रुपयांचं कर्ज असल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आल्याचं दिसून आलं. अजित पवार यांनी जेव्हा निवडणूक आयोगाकडे या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची नोंद आहे. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 7 लाख 20 हजारांची रोख रक्कम आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6 लाख 65 हजार 400 रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे बँकेत 3 कोटी 9 लाख 69 हजार 400 रुपयांची ठेव तर पत्नीच्या नावे 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपयांच्या ठेवी आहेत.