वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाचा मोठा वाटा होता. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर उपचारासाठी सरकारी मदत दिली. या सर्व कामात मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. परंतु आता मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होताच त्यांनी या पदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली आहे. डॉ.रामेश्वर नाईक हे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी असणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून डॉ. रामेश्वर नाईकच काम सांभाळत होते. त्यांना पुन्हा या जागी आणण्यात आलं आहे. या पदावर मंगेश चिवटे असताना त्यांनी उत्तमरित्या हा कक्ष सांभाळत सरकारच्या प्रतिमेला उंचीवर नेले. आणि आपल्या कामाची एक वेगळी छाप पाडली. अतिशय चिवटपणे पाठपुरावा करून चिवटे यांनी वैद्यकीय सहाय्यता योजनेची मदत रुग्णांपर्यंत पोहोचवली. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात मंगेश चिवटे यांचा कसा मोलाचा वाटा राहिला आहे ? अडीच वर्ष त्यांनी हा कक्ष कसा सांभाळला ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंगेश चिवटे यांना पाठवण्यात आलं होतं. त्यांनी आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केली. त्यावेळी मराठ्यांनी विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळीदेखील लावला त्यांना खांद्यावर उचलून घेतलं त्यामुळं चिवटे यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. चिवटे हे आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा ठरले होते. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षावर देवेंद्र फडणवीस यांनी डॉ रामेश्वर नाईक नाईक यांची नियुक्ती केली आहे. डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. 2014 साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार होते. नंतर त्यांनी धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम केले. ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना डॉ. रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती. नाईक हे गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. त्यांची नियुक्ती होताच मंगेश चिवटे यांनी त्यांचे अभिनंदन करत रुग्ण, रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय रुग्णसेवक म्हणून सुरु असलेला हा प्रवास यापुढेही असाच सुरु राहील असंही चिवटे यांनी म्हटलं आहे. चिवटे यांनी अतिशय चिवटपणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी पेलून दाखवली. सरकारी काम आणि महिनोनमहिने थांब अशी अवस्था आपण सर्वांनी पाहिलेली आहे. त्याच सरकारी व्यवस्थेचा भाग असलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना मात्र, अतिशय जलद गतीने मदत मिळणारी योजना म्हणून नावारुपाला आणण्यात चिवटे यांचा वाटा अतिशय मोठा आहे. प्रत्येक टप्प्यावर अतिशय चिवटपणे पाठपुरावा करून कामास मूर्त स्वरुप देण्याचं काम चिवटे यांनी केलं. यासाठी चिवटे यांच्यासोबत त्यांची टीम देखील अहोरात्र काम करताना दिसायची. रुग्णांना तत्पर सेवा मिळावी, त्यांच्यावरील उपचाराला उशीर होऊ नये म्हणून वैद्यकीय सहाय्यता योजनेसाठीची अंमलबजावणी एका क्लिकवर आणण्याचं काम चिवटे आणि त्यांच्या टीमने केले. एकनाथ शिंदे यांनीही चिवटे आणि त्यांच्या टीमला प्रोत्साहन दिले. त्यामुळंच अडगळीत पडलेला वैद्यकीय सहाय्यता कक्ष सर्वाधिक गर्दी खेचणारा विभाग ठरला.