मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण दिसून येत होती. मात्र, सोमवारी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी होणार असल्याच्या शक्यतेने दर वधारले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात होणाऱ्या घसरणीला ब्रेक लागला. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 89.38 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 83.92 डॉलर प्रति बॅरल इतका नोंदवण्यात आला. कच्च्या तेलाचे दर वधारले असताना दुसरीकडे भारतीय इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले आहेत. देशातील इंधन दरात कोणताही बदल झाला नाही.
देशात जवळपास 136 दिवसांपासून इंधन दर स्थिर आहेत. महाराष्ट्रात जुलै महिन्यापासून इंधन दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात राज्य सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील इंधन दर स्थिर आहेत.
- दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर