जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांची प्रमुख उपस्थिती
पुणे | कोणताही क्षेत्रात काम करीत असाल किंवा व्यवसाय करीत असाल तर, तुमच्यात एकी असणे आवश्यक असते. एकी असेल तर, तुमचे प्रश्न सुटतात. सुख-दुःखात हक्काची माणसे उभी राहतात. व्यापाऱ्यांमध्ये अशीच एकी निर्माण व्हावी म्हणून कॅम्प ज्वेलर्स ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करतण्यात आले होते. गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
पुष्पा स्पोर्ट्स ग्राऊंड येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कॅम्प ज्वेलर्स ग्रुपचे अध्यक्ष सुभाष ओसवाल, सचिव मनोज छाजेड आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीला गणपतीची आरती झाली आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
व्यापाऱ्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्या नेटवर्क निर्माण करण्याच्या उद्देशानेच ही क्रिकेट स्पर्धा कॅम्प ज्वेलर्स ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आली होती. या क्रिकेट स्पर्धेमध्ये पुरुषांचे ८ संघ तर, महिलांचे २ संघ सहभागी झाले होते. सुमारे १०० सदस्यांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी म्हणाले की, व्यवसायिक हा २४ तास त्याच्या व्यवसायाचा विचार करीत असतो. कामाचा ताण त्याच्यावर प्रचंड असतो. शिवाय व्यवसायामध्ये स्पर्धादेखील आहेच. अशा धकाधकीच्या जीवनात व्यापाऱ्यांचे आयुष्य चांगले राहायचे असेल तर, अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा सातत्याने होणे आवश्यक आहे. शिवाय अशा स्पर्धांमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकता वाढीस लागते. नेटवर्क वाढते. आणि यामुळे व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने वाढतो. सर्व वयोगटातील व्यापारी सदस्यांनी या स्पर्धेत भाग घेतल्याचा विशेष आनंद आहे. जीतो ही व्यावसायिकांच्या विकासासाठी काम करणारी संघटना आहे. आर्थिक सबलीकरण, ज्ञान, सेवा व सामाजिक कार्य याविषयी जीतो कार्य करीत आहेत. जगभर नेटवर्क असलेल्या जीतोचे सदस्यत्व घेतल्यास अनेक प्रकारच्या संधी निर्माण होत आहेत. याचाही विचार कॅम्प ज्वेलर्स ग्रुपच्या सदस्यांनी करावा.