पुणे । फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (फॅम) यांच्या तर्फे दि पूना मर्चेंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष व जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांना ‘फॅम समाजरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, सभासद व गोवर्धनदास मंगलूराम गोयल फर्मचे संचालक शुभम गोयल यांना ‘फॅम बिजनेस एक्सलन्स पुरस्कार’ देण्यात आला. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (फॅम) यांचा हा कार्यक्रम शुक्रवारी मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमास राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डचे अध्यक्ष सुनील सिंघी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याबरोबरच महाराष्ट्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारासाठी दि पूना मर्चेंटस् चेंबरकडून सदरची नामांकने पाठविण्यात आली होती, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.