पुणे | वडीलांचा मित्र असलेल्या अाणि व्यवसायाने वकीली करणाऱ्या एका ७५ वर्षीय इसमाने ३६ वर्षीय विवाहित महिलेस बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी पिडित महिलेने अाराेपी विराेधात काेंढवा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अाहे.
पिडित महिलेच्या फिर्यादीनुसार याबाबत पाेलीसांनी वसंत धडकु पाटील (वय-७५,रा.राेझवुड साेसायटी, शिवाजीनगर,पुणे) या अाराेपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला अाहे. संबंधित घटना मार्च २०१९ पासून १८/५/२०२२ यादरम्यान पुण्यातील डेक्कन, शनिवार पेठ व काेंढवा परिसरात घडल्याची माहिती पिडित महिलेने पाेलीसांना दिली अाहे. अाराेपी वसंत पाटील हा पिडित विवाहित महिलेच्या वडीलांचा मित्र अाहे. त्याने महिलेस तिची बदनामी करण्याची धमकी देवून तिच्या नवऱ्यास तिच्याबाबत उलट सुलट माहिती सांगण्याची भिती दाखवून तसेच तिच्या मुलाचे बरेवाईट करण्याची भिती दाखवली. तक्रारदार महिलेने अाराेपीकडून हेवी डीपाॅझीटवर घेतलेला फ्लॅट महिलेच्या नावावर करुन देण्याचे अमिष दाखवून तिला वेगवेगळया ठिकाणी घेवून जावून तिच्या इच्छे विरुध्द जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवण्यात अाले अाहे. बदनामीच्या भितीने महिलेने याप्रकरणी विलंबाने तक्रार दिल्याची माहिती पाेलीसांनी दिली अाहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पाेलीस ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस शिळमकर करत अाहे.
महिलांचा विनयभंग करणारा जेरबंद
येरवडा परिसरात अरुण लहु गालफांडे (वय-२४) हा तरुण त्याच्या राहत्या घराजवळील वेगवेगळया घरात नग्न अवस्थेत शिरुन महिलांचा विनयभंग करत असल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. याप्रकरणी येरवडा पाेलीसांकडे तक्रार दाखल केलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या घरात बळजबरीने नग्न अवस्थेत शिरुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करुन तिचे ताेंड ताबुन तिला गप्प रहाण्यास सांगितले. मात्र, महिला घराबाहेर अाेरडत बाहेर पळाल्यानंतर सदर प्रकार उघडकीस अाला. अाराेपीने अशाचप्रकारे सदर भागातील अन्य तीन घरात ही नग्न अवस्थेत शिरुन तीन महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केल्याने त्यास पाेलीसांनी अटक केली अाहे.