पुणे | संस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अतिशय निंदनीय घटना घडत आहेत. पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका 19 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने किस घेतल्याची संतापजनक घटना पुण्यातील येवलेवाडीत उघडडीत घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. रईस शेख असे अटक करण्यात आलेल्या 40 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
येवलेवाडीतील हायप्रोफाईल वस्तीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने शनिवारी रात्री झोमॅटोवरुन जेवण मागवले होते. रईस शेख हा रात्री 9.30 च्या सुमारास जेवणाचे पार्सल घेऊन आला. पार्सल दिल्यानंतर आरोपी रईसने तरुणीकडे पाणी पिण्यासाठी मागितले. तरुणीने पाणी दिल्यानंतर आरोपीने थँक यू म्हणण्यासाठी हात मिळवला. मात्र हात सोडतच नव्हता. तरुणीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून तरुणीला जवळ ओढले आणि तिच्या गालावर दोन किस घेतले. किस केल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.
यानंतर तरुणीने तात्काळ कोंडवा पोलीस ठाणे गाठले आणि सर्व घडला प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉय विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला कोंढवा परिसरातून अटक केली आहे.