औरंगाबाद | औरंगाबाद पोलीस आणि एटीएस पथकाने संयुक्त कारवाई करत सोमवारी मध्यरात्री जिल्ह्यातील विविध् भगातून पी.एफ.आय या संघटनेशी संबंधित असलेल्या 13 जणांना अटक केली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुण्यात पीएफआयशी संबंधित 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात तपास यंत्रणांनी देशभरात छापेमारी करत शंभरहून अधिक जणांना अटक केली होती. त्यात पीएफआय संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष शेख नासेंर शेख साबेर उर्फ नदवी (वय 37 रा.बायजीपुरा, औरंगाबाद) सह शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजलं सय्यद खालील, परवेज खान मुजमिल खान, अब्दुल हादी अब्दुल रौफ या पाच जणांना अटक केली होती. त्याच प्रश्वभूमीवर औरंगाबाद एटीएस आणि गुन्हेशाखा पथकाने सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात कारवाईला सुरुवात केली होती. ही कारवाई आज पहाटेपर्यंत सुरू होती. या कारवाई औरंगाबाद एटीएस विभागाच्या कार्यक्षेत्रातील एकूण 18 ते 20 जणांना पोलिसांनी तब्यात घेतले, असल्याची माहिती समोर येत आहे. यातील तब्बल 13 जणांना हे औरंगाबदेतील आहेत. हे सर्वजण (पीएफआय) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित आहेत.
सर्वजण संघटनेच्या मोठ्या पदावरील नाहीत. खालच्या फळीतील कार्यकर्ते आहेत. तब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्यातील काहींना सिटीचौक पोलीस ठाण्यात तर उर्वरितांना सिडको पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.