मुंबई | अखेर आयफोन युजर्सची प्रतिक्षा संपली असून दिग्गज ॲपल कंपनी ने आपला बहुप्रतीक्षित iPhone 14 भारतात लॉन्च केला आहे. ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून या फोनच्या लॉन्चिंगची वाट पाहत होते. अखेर हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. ॲपलच्या इव्हेंट कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला आहे.
कंपनीने आपले म्हणणे मांडले आहे की, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस आयफोनमध्ये सर्वोत्तम बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन A15 बायोनिक चिपवर चालतात. ॲपलने आयफोनमधील चिपचा पुनर्वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.यावेळी Apple ने iPhone 14 मध्ये नवे अनोखे फिचर आले आहे. नव्या फोनमध्ये सिम कार्ड स्लॉट ठेवण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला आहे. मात्र कंपनीने हे फक्त अमेरिकेत लॉन्च केलेल्या फोनसाठीकेलं आहे. भारतात सिम कार्ड स्लॉट दिले जाण्याची शक्यता आहे.
नवीन लॉन्च केलेल्या आयफोन 14 चा स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर आयफोन 14 प्लस स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. हे दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध करण्यात आले आहे. आयफोन 14 चा फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा 12 एमपीचा देण्यात आला आहे.
तसेच नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबतच कार क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध करण्यात आले आहे.ॲपलचा असा दावा आहे की, आयफोन 14 हा आत्तापर्यंतचा सर्वात फास्ट फोन आहे. Apple iPhone 14 पाच रंगात लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड या आकर्षक रंगामध्ये बनवण्यात आले आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाईट’ हे फीचर नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार. अमेरीका आणि कॅनडातून याची सुरुवात होणार आहे. तसेच ॲपल आयफोन 14 सप्टेंबर 16 पासून उपलब्ध होणार तर आयफोन 14 प्लस ऑक्टोबर 7 पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.ॲपल 14 ची किंमत 799 डॉलर्स आणि भारतात 79,999 रुपये तर ॲपल 14 प्लसची किंमत 899 डॉलर्स आणि भारतात 99,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.