मुंबई | PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. असा खळबळजनक दावा केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. जुलै 2022 मध्ये पीएफआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उत्तरप्रदेशातील इतर संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याच्या कट रचला होता, असं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे.
देशभरात दोन दिवसांपूर्वी तपास यंत्रणांकडून पीएफआयच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आलं. केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर केलेली कारवाई ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी पीएफआयने पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा डाव रचला होता, असा धक्कादायक दावा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमधून पीएफआय संघटनेचा सदस्य शफीक पायेथला अटक केली होती. त्याच्या रिमांड नोटमध्ये तपास यंत्रणांनी हा दावा केला आहे.