फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे. हे दिल्लीतील नोएडामधील पोलिसांचं मोठं यश म्हटलं जातं. आहे.
नोएडा एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणीदरम्यान एका संशयिताला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पळून गेला. फिल्म सिटीजवळ त्याची चकमक झाली, ज्यात तो (दानिश) जखमी झाला. दिल्ली एनसीआरमध्ये यावर 21 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. नोएडातही सेक्टर 20 मध्ये याबाबत गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये त्याचा शोध घेतला जात होता.
नोएडा एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला व्यक्ती चेनू टोळीचा शूटर आहे. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल, एक बंदुक आणि 3 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अन्य आरोपांचा तपास सुरू असून घटनास्थळावरून फरार झालेल्या अन्य एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.