नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) हे निवडणुकीच्या रिंगतात आहेत. आज मतदान पार पडले. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे 71 टक्के मतदान झाले. सायंकाळी 4 वाजता मतदान संपले असून, खर्गे-थरूर यांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल 19 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी खर्गे-थरूर यांनी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या. कार्यकर्त्यांनीही याला मोठा प्रतिसाद दिला होता. त्यानुसार, आज मतदान पार पडले. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी तीनपर्यंत 71 टक्के मतदान झाले. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी व्यक्ती असल्याने मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बेल्लारी येथे मतदान केले. त्यांच्यासोबत सुमारे 40 नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आता या निवडणुकीचा निकाल दोन दिवसांत म्हणजे 19 ऑक्टोबरला जाहीर होणार असून, त्याचवेळी अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे.