ब्रिस्बेन | टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा दुसरा सराव सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. त्याचवेळी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील किवी संघाचा दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र ब्रिस्बेनमध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने भारत विरूद्ध न्यूझीलंड संघाचा सराव सामना रद्द करावा लागला आहे. याच मैदानावर आज पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान हा सराव सामना खेळवण्यात आला होता.
ब्रिस्बेनमध्ये संततधार पाऊस बसरत असल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना रद्द करण्यात आला आहे.
पावसामुळे आतापर्यंत सराव सामन्यात नाणेफेक झाली नाही. ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडत आहे. 4.16 वाजेपर्यंत नाणेफेक झाली तर 5-5 षटके खेळता येतील.मात्र तोपर्यंत नाणेफेक न झाल्यास सामना रद्द केला जाईल.
गाबा येथे सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत सामना वेळेवर सुरू होणे अपेक्षित नाही. सध्या संपूर्ण मैदानावर कव्हर असले तरी दोन्ही संघांचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.