नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा विजय झाला आहे. अध्यक्षपदी विजय होताच खर्गे यांनी पक्षांतर्गत निवडणूक यशस्वीपणे घेतली, यासाठी मी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्वांचे मी आभार मानतो, असे म्हटले आहे.
सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला असून, थरूर पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली. यामध्ये तब्बल 400 मते बाद झाली आहेत. विजय झाल्यानंतर खर्गे यांनी सांगितले की, ‘काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर पक्षांतर्गत निवडणूक घेऊन देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं उदाहरण समोर ठेवलं आहे. पक्षांतर्गत निवडणूक यशस्वीपणे घेतली. यासाठी मी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाशी संबंधित सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत काँग्रेसला मजबूत केले आहे’.
दरम्यान, माझे सहकारी शशी थरूर यांनाही मी शुभेच्छा देतो. कारण निवडणुकीत आम्ही प्रतिस्पर्धी होतो. निवडणूक खूप चांगल्याप्रकारे झाली. निवडणुकीनंतर तेही मला येऊन भेटले. यावेळी आम्ही पक्षाला पुढे घेऊन जाण्याबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.