मोरबी | गुजरातच्या मोरबी येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही घटना रविवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. यामध्ये जवळपास 140 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावनिक झाले. ‘मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मला अत्यंत दु:ख झाले. माझे मन या घटनेने व्यथित झाले आहे,’ असे ते म्हणाले.
मोरबी येथील पूल ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता. हा पूल 140 वर्षांपेक्षाही जुना असल्याचे सांगितले जात आहे. या पुलाच्या दुरूस्तीचे काम पाच दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. अचानक हा पूल कोसळला. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी भर सभेत भावनिक झाले. ते म्हणाले, ‘मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अत्यंत दु:ख झाले. माझे मन या घटनेने व्यथित झाले आहे. विकास कार्यक्रमात जावे की नको, त्याबाबत माझ्या मनात साशंकता होती. पण या लोकांच्या प्रेमापोटी मी कार्यक्रमात आलो’.
दरम्यान, हा पूल सेफ्टी सर्टिफिकेटशिवाय सुरु असल्याने पर्यटकांसाठी खुला केलाच कसा, 100 लोकांची क्षमता असणाऱ्या पुलावर 300-400 लोक पोहोचलेच कसे असा सवाल आता उपस्थित केले जात आहेत.