ॲडलेड | टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विरुद्ध बांग्लादेश सामना बुधवारी 2 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तान, नेदरलँड यांच्यावर मात करत केली असली तरी मात्र दक्षिण आफ्रिकेने भारतावर पराभव करून विश्वचषकातील स्थिती काहीशी अवघड झाली आहे. ज्यामुळे भारताला आता बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे.
परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यात जर पाऊस झाला तर भारताला तोटा होऊ शकतो. कारण सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघाना 1-1 गुण मिळेल, ज्यामुळे भारत स्प्धेत अधिक आघाडी घेऊ शकणार नाही.
भारत आणि बांग्लादेश हे संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये आमनेसामने येणार आहेत. अॅडलेडची खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. दरम्यान दोन्ही संघासाठी चांगली आघाडी घेऊन सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊस टाकण्याकरीता भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची तब्बल 95 टक्के शक्यता आहे. याशिवाय 25-30 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने वारे वाहतील. दरम्यान पावसाची दाट शक्यता असल्याने क्रिकेट रसिक नाराज असून भारतासाठी हा सामना रद्द झाल्यास पुढे पोहोचणे अवघड होणार आहे.
टी-20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील.
दरम्यान, संपूर्ण भारताचे तसेच क्रिकेटप्रेमींची संपूर्ण उत्सुकता या सामन्याकडे लागून राहिली आहे.