लंडन | एका रेस्टॉरंटमध्ये 14 लोकांचा ग्रुप जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर जेव्हा बिल हातात आलं तेव्हा ते पाहून सर्वांना धक्काच बसला. कारण बिलं आलं होतं 1.3 कोटी रुपये इतकं. सोशल मीडियावर याच बिलाची चर्चा सुरु आहे. हे बिल व्हायरलही केले जात आहे.
Nusr-et नावाचे हे रेस्टॉरंट लंडनमध्ये आहे. हे रेस्टॉरंट अनोखे ‘गोल्ड कोटेड स्टीक’मुळे अत्यंत प्रसिद्ध आहे. Nusr-et Gokce या कंपनीने एक पोस्टमध्ये सांगितले की, इथं 24 कॅरेट सोन्याची स्टीक दिली जाते. याबाबतचा फोटो शेअर करत त्यात म्हटले की, इथं क्वालिटीबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. या रेस्टॉरंटची जगभरात 22 शाखा आहेत.
नुसरत युके लिमिटेड कंपनीने ऑगस्ट महिन्यात सांगितले की, आमची उत्पादने ग्राहकांना आवडत आहेत. त्याचा विशेष वर्ग आहे. आमच्या उत्पादनातून आम्हाला 22 कोटींचा फायदा झाला. Bordeaux आणि Baklava या वाईन प्रकारांचा जगभरातील महागड्या डिशेसमध्ये समावेश आहे.