नवी दिल्ली | सेवा निवृत्तीनंतर केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन दिली जाते. पण ही पेन्शन मिळवताना दरवर्षी निवृत्तीधारकांना त्यांच्या हयातीचा दाखल द्यावा लागतो. त्यामुळेच आता सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे. निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या हयातीचा दाखला पोस्टमनकडूनही मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवृत्ती वेतनधारकांना शासकीय सुविधा आणि पेन्शन मिळवण्यासाठी हयातीचा दाखल देणे गरजेचे असते. त्यामुळे या सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या फायद्यासाठी सरकारने हयातीचा दाखला डिजिटल पद्धतीने देण्याचे म्हटले आहे. त्यासाठी संबंधित निवृत्ती वेतनधारकाला 70 रुपये शुल्क भरल्यानंतर डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला मिळणार आहे.
आत्तापर्यंत सर्व निवृत्ती वेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागते. पण आता हे प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून मिळणार असल्याने याचा फायदा हजारो निवृत्तीधारकांना होणार आहे.