बेळगाव | महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यात महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, अशी तंबीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या वाहनावर बेळगावात दगडफेक करण्यात आली.
पुण्याहून बंगळुरूला जाणारा महाराष्ट्रातील ट्रकचा नंबर पाहून कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये ट्रकच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध केला.
दरम्यान, पुण्यातही कर्नाटकच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत महाराष्ट्र-कर्नाटक हा वाद पेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.