गांधीनगर | संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकांचे निकाल समोर येत असून, भाजपला गुजरातचा गड राखण्यात यश आले. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा अक्षरश: सुपडासाफ होताना दिसत आहे. भाजप 150 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 19 आणि आम आदमी पक्ष 7 मतदारसंघात आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडले. गुजरातमध्ये भाजपची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत भाजप आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. पण सध्याच्या निकालावरून काँग्रेस, आपचा कमालीच्या पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाली असून, तीन तासांनी भाजप 150 जागांवर आघाडीवर असून, 53.6 टक्के मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस 19 जागांवर आघाडीवर असून, फक्त 26.6 टक्के मतं मिळाली आहेत. तर ‘आप’ला एकूण 12.8 टक्के मतं मिळाली आहेत.