नवी दिल्ली | सध्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. GooglePay, Paytm, PhonePe यांसारख्या ऍप्सचा वापर पैसे पाठवण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी केला जातो. काही कंपन्यांकडून व्यवहार करताना काही रक्कम Reward म्हणून दिली जाते. पण आता Paytm च्या माध्यमातून वीज बिल भरल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळणार आहे.
Paytm कडून Bijlee Days ची घोषणा करण्यात आली. या स्कीमअंतर्गत Paytm च्या माध्यमातून वीज बिलावर 100 टक्के कॅशबॅक आणि ऍडिशनल रिवॉर्ड्स देत आहे. त्यासाठी युजरला दर महिन्याला 10-15 तारखेदरम्यान पेमेंट करावे लागणार आहे. पेमेंट ऍप Paytm 100 टक्के कॅशबॅक आणि 2 हजार रुपयांपर्यंत फायदा कमीत कमी 50 युजर्सला दिला जाणार आहे. Bijlee Days दरम्यान पेमेंट करणाऱ्या ग्राहकाला हा फायदा मिळणार आहे.
याशिवाय ग्राहकाला टॉप शॉपिंग आणि ट्रॅव्हल ब्रँडमधून डिस्काउंट वाउचरही देण्यात येणार आहे. Paytm ऍपच्या माध्यमातून पहिल्यांदा बिल पेमेंट करणाऱ्या ग्राहकाला 200 रुपयांपर्यंत कॅशबॅकही दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी Promo Code चा वापर करावा लागणार आहे.