चंदीगड | काँग्रेसचे खासदार संतोख सिंह भारत जोडो पदयात्रेत सहभागी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहून त्यांना तातडीनं फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
सध्या भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत संतोख सिंह पदयात्रेत सहभागी झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटलला रवाना झाले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संतोख यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत दुखः व्यक्त केले आहे.