30 जुलै 2014 आणि आता 30 जुलै 2024. तीच तारीख, तोच महिना. बरोबर दहा वर्षांनी महाराष्ट्रातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात जे अघटित घडलं तेच केरळच्या वायनाडमध्ये घडलं. दोन्ही घटनांमध्ये इतकं साम्य की, एकाच तारखेला या घटना घडाव्यात. यामुळं आख्खा जनसमुदाय हळहळतोय. जुलै महिन्याचा मुसळधार पाऊस आणि अख्ख गावच डोंगराखाली गडप झालं. दहा वर्षांपूर्वी 175 लोकसंख्येच्या माळीण गावालगतची दरड पावसामुळं कोसळली आणि गावातले 151 जण झोपेत असतानाच त्याखाली गाडले गेले. बरोबर दहा वर्षांनी केरळमधील वायनाडमध्ये पावसामुळे दरड कोसळली. आणि साखर झोपेत असताना १५० जण त्याखाली गाडले गेलेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताय. वायनाडमध्ये नेमकं काय घडलं? देशात भूस्खलनाच्या घटना का वाढत चालल्या आहेत? याची कारणं काय? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.