पुणे | विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात तीन पेक्षा अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे बनावट प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले आहे.
यामध्ये एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांचा समावेश आहे.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. शिक्षण विभागाने या बोगस शाळांची नावे जाहीर केली आहे. शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी ‘सीबीएससी’च्या सर्व शाळांनी मान्यता आदेशाची प्रत नोटीस बोर्डावर लावावी अशी सूचना देखील दिली आहे.
तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या बोगस शाळांवर कारवाईचे आदेश दिले आहे.