पुणे | सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित असलेल्या सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीच्या पहिल्या तुकडीचा (बीएस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्स) निकाल १०० टक्के लागला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील किंबहुना भारतातील पहिलाच अभ्यासक्रम असलेल्या बीएस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्समधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला तृतीय वर्षातील एकूण २२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’ ही श्रेणी तर आठ विद्यार्थ्यांना ‘ए’ श्रेणी मिळाली आहे. त्यापैकी निखिल शर्मा (८६.६८ टक्के), अरुण दाभाडे (८०.८२ टक्के), तर गौरव कोळी (७८.९४ टक्के) यांनी ‘ए प्लस’ श्रेणीसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्समध्ये बीएस्सी असलेला हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशातील पहिलाच अभ्यासक्रम असावा. या शाखेतील पहिले २२ सायबर सिक्युरिटी विषयाचे तज्ज्ञ ‘सूर्यदत्त’ संस्थेतून उत्तीर्ण झाले, असे मत प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
तसेच त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व प्राचार्य डॉ. अरिफ शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.