पुणे | उत्तम शिल्पकला बघितली, तिची निर्मिती समजून घेतली तर, आपल्यामधूनही जागतिक दर्जाचे आणि जागतिक कीर्तिचे शिल्पकार होऊ शकतात. हेच उद्दीष्ट समोर ठेवून लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल, टेन टी इंटरनॅशनल स्कूल व लोकसेवा ई स्कूल पाषाण मधील विद्यार्थ्यांसाठी गणपती सजावटीच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यशाळे अंतर्गत लोकसेवाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या गणेशोत्सव सजावट विभागास रविवारी भेट दिली. आणि यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी असणाऱ्या पंच केदार मंदिराचा देखावा व त्याच्या सजावटीविषयी तेथील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडून या सर्व विषयाची सखोल माहिती करून घेतली…

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून या गणेशोत्सव सजावट भेटीचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाचा देखावा बनवण्यासाठी, सजावट करण्यासाठी किती कष्ट व मेहनत करावी लागते याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.
विद्यार्थ्यांच्या भेटीचे शंकर साळुंखे, भारत पवार, सोमनाथ आवचर, विनायक, शुभांगी कुलकर्णी, श्रीमंत खरात यांनी नियोजन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व निरीक्षणाच्या नोंदी ठेवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.