मुंबई | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो चांगलाच प्रसिद्ध आहे. या शोमधील सर्वच पात्र त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. त्यातील एक पात्र असलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही अभिनेत्री सध्या जर्मनीत आहे. मात्र, तिथंच तिचा अपघात झाला आहे, अशी माहिती तिने स्वत: दिली आहे.
गेल्या आठवड्यापासून मुनमून दत्ता ही युरोप दौऱ्यावर आहे. स्वित्झर्लंड आणि जर्मनी हे देश फिरण्यासाठी गेली आहे. त्यावेळी तिचा एक छोटा अपघात झाला असल्याचे माहिती तिने स्वत: इन्स्टाग्रामवर दिली आहे. त्यामध्ये तिने म्हटले की, ”जर्मनीमध्ये माझा एक छोटा अपघात झाला आहे. माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे मला माझी ट्रिप मध्येच सोडून घरी परतावं लागतं आहे”
मुनमून दत्ता हिने ही पोस्ट टाकताना तुटलेल्या हार्टची इमोजीही लावली आहे. तसेच या अपघातामुळे तिला ट्रिप अर्ध्यातूनच सोडावी लागत असल्याने दु:ख व्यक्त केले आहे.