मुंबई | कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग थांबले होते. यातच बॉलिवूड सिनेमेही पडद्यावर झळकण्यास बंद झाले होते. पण आता सिनेमागृह पुन्हा सुरु झाले. मात्र, अनेक अभिनेत्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. यामध्ये अक्षय कुमार, आमिर खान, प्रभास यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्सचा समावेश आहे.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार याचे हे वर्ष अतिशय साधारण राहिले. अक्षयला यावर्षी सिनेमा फीमध्ये सुमारे 40 टक्के कपात करावी लागली.
सम्राट पृथ्वीराज – बजेट – १७५ करोड – कमाई ९० कोटी.
रक्षाबंधन – बजेट ७० कोटी – कमाई ५० कोटी
बच्चन पांडे – बजेट ११० कोटी – कमाई ४६ कोटी
आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान वर्षातून एकच चित्रपट करतो तो चित्रपट जबरदस्त हिट होतो. पण यावर्षी आमिर खानचीही जादू काही चालली नाही. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अत्यंत आशयपूर्ण असूनही तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘बॉयकॉट’चा मोठा फटका या चित्रपटाला बसला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली.
लाल सिंग चड्ढा – बजेट १८० कोटी, कमाई ६० कोटी
कंगना राणावत
नेहमीच चर्चेत असणारी धाकड गर्ल कंगना राणावतच्या ‘धाकड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काहीच धाकड दाखवली नाही. हा चित्रपट फ्लॉप तर झालाच पण तो इतका आपटला की चित्रपटातील स्टार्सचे मानधन देखील पूर्ण करू शकला नाही.
धाकड – बजेट ८० कोटी, कमाई २० कोटींपेक्षा कमी.
प्रभास
बाहुबली फेम साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पुजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ चित्रपट पडला. प्रभाससारखा स्टार असूनही या चित्रपटाने जास्त कमाई केली नाही. हा चित्रपट तूफान चालेल अशी अपेक्षा होती, पण तसे प्रत्यक्षात झाले नाही.
राधेश्याम – बजेट ३५० कोटी. कमाई १८४ कोटी.
शाहिद कपूर
‘कबीर सिंग’सारखा हिट चित्रपट देऊन आपल्या अभिनयाने शाहिद कपूरने लोकांची मने जिंकली होती. पण ‘जर्सी’ हा चित्रपट आला कधी आणि गेला कधी हेच समजले नाही. ‘कबीर सिंग’सारखा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
जर्सी – बजट ८० कोटी, कमाई ३० कोटी.