मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत ही बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी सर्वश्रुत आहे. तिचे अनेक निर्णयही आश्चर्यचकित करणारे आहेत. आता कंगना थेट फिल्मफेअरसोबत पंगा घेत असल्याचं समजतयं. कंगनाने फिल्मफेअरवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारणही आश्चर्यकारक आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या बद्दलची माहिती दिली.
पुरस्कारासाठी नामांकित केल्यामुळे कंगना फिल्मफेअरवर गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं जातयं. वास्तविक इतर अभिनेते-अभिनेत्री नामांकन मिळाल्यनंतर अत्यानंदी होतात. तसेच फिल्मफेअरचे मनभरून आभार मानतात. मात्र कंगनाने थेट खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. कंगना आपल्या विचारांवर ठाम राहणारी अभिनेत्री असल्याने तिचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे.
कंगणाने फिल्मफेअरवर गुन्हा दाखल करण्याचं कारणही सांगितलं आहे. 67 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 साठीची नामांकन यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये रणवीर सिंगला ’83’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे, तर कंगनाला ‘थलायवी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला श्रेणीत नामांकन मिळाले आहे. याचा तिला राग आला आहे.
इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाने स्पष्ट लिहिले आहे की, आपण 2014 पासून फिल्मफेअरवर बंदी घातली असून फिल्मफेअर हे अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अन्यायकारक आहे. त्यामुळे आपण याचा भाग होणार नाही.
कंगनाने 2013 सालची आठवण करून देत ती म्हणाली की, 2013 मध्ये फ्लिमफेअरने मला स्पष्टपणे सांगितले होते की जर मी तिथे अवॉर्ड शो ला उपस्थिती लावली नाही किंवा स्टेजवर डान्स केला नाही तर मला पुरस्कार मिळणार नाही आणि यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मला अनेक कॉल येत आहेत, कारण त्यांना ‘थलायवी’साठी हा पुरस्कार द्यायचा आहे.
कंगना म्हणाली, “ते अजूनही मला नॉमिनेट करत आहेत हे कळल्यावर मला धक्का बसला. अशा भ्रष्ट कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे हे माझ्या प्रतिष्ठेच्या, नैतिकतेच्या आणि मूल्यांच्या विरुद्ध आहे. म्हणूनच मी फिल्मफेअरवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.