पुणे | कपाळावरचा लाल टिळा, चेहऱ्यावरील वाढलेली दाढी, पांढरे शुभ्र कपडे असे वर्णन केले की डोळ्यासमोर येतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा. एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता संपूर्ण राज्यात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुबेहुबे व्यक्तीची देखील लोकप्रियता वाढताना दिसत आहे. सध्या मुंबई पुण्यासह राज्यात गणपतींचा उत्साह पाहायला मिळतं आहे. सणांमध्ये राजकारण्यांनी हाय डिमांड वर असतात.अनेक मंडळे राजकारण्यांना आरतींसाठी आमंत्रणे पाठवतात. आता मात्र राजकारण्यांबरोबरचं डुप्लीकेट राजकारण्यांची लोकप्रियता वाढत आहे.
सध्या पुण्यात सुद्धा एक तरुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखा दिसत असल्याने त्याची चर्चा अधिक वाढली आहे. त्या तरूणाचं नाव विजयराजे माने असं आहे. दहीहंडी उत्सवा दरम्यान याच डुप्लीकेट मुख्यमंत्र्याचा डान्स खूप व्हायरल झाला होता. तसेच अनेकांनी तो सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. तशीच दाडी, तसाच गॉगल आणि फेटा घातलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्याला सुद्धा आता गणपतीच्या काळात आरतीची अधिक आमंत्रणे येत असल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा, दाढी,कपाळावरचा टिळा, व्हाईट कपडे या सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांचे डुप्लिकेट दिसतात.आता विजय माने यांना त्यांच्या या हुबेहूब दिसण्याचा अनेकदा फायदा, तर कधी तोटा होत असतो. माने यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ते जिथे जातील तिथे अनेक तरुण हट्ट धरतात. एवढेच काय तर अनेक लोक प्रस्ताव आणि निवेदन घेऊन माने यांच्या घरी जातात. आता गणेशोत्सवात तर मुख्यमंत्र्यांच्या या डुप्लिकेट असणाऱ्या विजय मानेंना पुण्यातील अनेक मंडळ आरतीसाठी बोलवत आहेत. माने रोज शहरभर फिरून सात ते आठ मंडळाच्या आरत्या पार पडतात. एवढेच नाही तर माने यांना अनेक उद्घाटनाला देखील बोलावलं जात आहे.