पुणे । आदिवासी अल्पभूधारक शेतकरी आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून ट्राइब ग्रोनचा जन्म झाला.दिवंगत रवींद्र वानखडे यांनी या कंपनीची स्थापना केली. त्यांचे चिरंजीव भावेश वानखडे याने पुढे ट्राइब ग्रोनसाठी कार्य सुरु ठेवले. ‘ट्राईब ग्रोन’च्या माध्यमातून शाश्वत उपजीविका, जैवविविधता संवर्धन , उच्च-गुणवत्तेची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात.’ट्राईब ग्रोन’ अमरावतीच्या जंगलांतून गोळा केलेले नैसर्गिक मध, शुद्ध देशी गाईचे तूप,आणि पॉलिश न केलेली आणि प्रक्रिया न केलेली हळद हि उत्पादने शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे.